Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसी व्ही.जे.एन.टी. करिता नवीन वसतिगृह सह सर्व वसतिगृह तत्काळ सुरू होणार - विजय वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  चंद्रपूर - अखिल भारतीय विमुक्त जात...
  • आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
चंद्रपूर -
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन 72 वसतिगृह मंजूर करून व राज्यातील कोरोना सदृश वातावरण संपले असल्याने राज्यातील सर्वच वसतिगृह तत्काळ सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबिविण्यासाठी तत्काळ वसतिगृह सुरू करावे अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात व इतर पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर परिसर येथे भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केले असता मंत्री महोदयांनी विषय समजून घेऊन याबाबत सर्व आराखडा व निधी मंजूर करून घेतलेले असून लवकरच कार्यान्वित होणार व कोरोनामुळे बंद पडलेले सर्व वसतिगृह दिवाळी नंतर सुरू करण्यास संबधित विभागाला तत्काळ सूचना करणार असे आश्वासित केले. तसेच लवकरच सर्व वसतिगृह सुरू होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आनंदराव अंगलवार सह सतीश मालेकर, ए.ए. डहाक, चंद्रशेखर कोटेवार, विजय पोहनकर व बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top