Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: या वर्षीची दिवाळी उमेद समुहासोबत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उमेद स्वयंसहाय्यता समूहाच्या दिवाळी फराळ व साहित्य विक्री स्टॉलचे उदघाटन मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चिमूर - महाराष्ट्र राज्य ग्रामी...
  • उमेद स्वयंसहाय्यता समूहाच्या दिवाळी फराळ व साहित्य विक्री स्टॉलचे उदघाटन
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्तापन कक्ष चंद्रपूर च्या माध्यमातून समुहातर्गत लघु उद्योगांना चालना मिळावी विक्रीसाठी नवीन दालन या उद्देशाने पंचायत समिती परिसरात दिवाळी निमित्य दि, 29/10/2021 रोजी दिवाळी फराळ, इको फ्रेंडली आकाश कंदील, दिवे, रांगोळी व इतर अनेक वस्तू ची प्रदर्शनी व विक्री चे उद्घाटन पं.स. च्या सभापती केमाताई रायपुरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जुमनाके, उपसभापती, शामराव चंद्रकांत धोडरे, संजय यादव, वंदना पिंपळशेंडे, सरिता कोवे, सिंधू लोनबले, संगीता उपरे, गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने, शितल देरकर यांची उपस्थिती होती. 
कु, प्रतीक्षा खोब्रागडे, कु, जयश्री नागदेवते, चवरे, ढोणे, फुके, कलसकर, भोपे, कु, जांभुलकर यांनी सदर कार्यक्रमाकरिता सहकार्य केले. तालुक्यातील अनेक बचत गटांनी यावेळी आपल्या उत्पादनाचे स्टॉल लावले यात प्रामुख्याने पारिजात महिला बचत गट दाताळा, महिला बचत गट दुर्गापूर, चिंचाला येथील सौ. संगीता ठेंगणे, सीमा विरुटकर, प्रेरणा एडणुरवार, इंदिरा बुरबांदे, पिंकी सेलोकर व इतर महिला सहभागी झाल्या होत्या.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top