Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन - शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन संतोष दीक्षित - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - तालुक्यातील नलफडी, विह...
  • रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन
संतोष दीक्षित - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
तालुक्यातील नलफडी, विहीरगाव, खांबाळा, कापणगाव लगत असलेल्या नाल्यामध्ये रात्री बेरात्री अवैध रित्या रेती चोरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करायला नाहक त्रास होत असून घाटात केलेल्या खोदकामुळे केल्याने मनुष्य-प्राण्यांची जीवितहानी अथवा जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात अश्याप्रकारे रेती तस्करी वाहतूक अशीच सुरु राहली तर नागरिकांना याचा मोठा त्रास होईल आणि परिणामता शासनाचा महसूलही बुडेल.
या पार्श्व् भूमीवर परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात तथा शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार तसेच वन अधिकारी राजुरा यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार यांनी अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक प्रशासनाने थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 
याप्रसंगी शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, राजुरा तालुका प्रमुख वासुदेव चापले, राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार, धोपताला तंटा मुक्त समिती अध्यक्ष रोहित नलके, समीर शेख, कुंदन येरमे, राजू मडावी, आशिष नुती, समीर बेढा, रोहन करगल, शानू शेख, शिवम नलके व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top