- वेकोलिच्या खाणीत कामगारांच्या सुरक्षेविषयी दुर्लक्ष
गडचांदूर -
महालक्ष्मी कंपनीच्या अन्तर्गत के.पी.एल. एंटरप्राइजेस नावाची कंपनी पैनगंगा ओपन कास्ट विरूर गाडेगाव या ठिकाणी काम करत आहे. या कंपनीमध्ये सुरक्षेच्या प्रती कोणतीही प्रकारची उपाय योजना नाही आहे. या कारणांमुळे याच्या अगोदर छोट्या मोठ्या घटना घडलेल्या आहे व काल दिनांक 29/10/2021 ला रात्री मोठी दुर्घटना झाली व एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कोरपना तालुक्यातील पैनगंगा या खुल्या कोळसा खाणीत पोक्लेन मशीनमध्ये दबून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ आक्टोंबर रोजी घडली. मृत व्यक्तीचे नाव दिनेश पटेल असे असून त्याठिकाणी ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. वेकोलीच्या पैनगंगा खुल्या कोळसा खाणीत महालक्ष्मी या प्रायव्हेट कंपनीद्वारे कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. अशातच दिनेश पटेल हा रात्रपाळीत पीसी मशीनवर काम करत होता. त्यानंतर तो शौचास गेला असता त्यांच्या सोबत असलेल्या कामगाराने पीसी मशीन चालविण्याचा प्रयत्न केला. दिनेश याच्यावर पीसी मशीन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेचे महासचिव सूनील बाबुराव ढवस याने ठाणेदार पोलीस स्टेशन, गडचांदूर यांना महालक्ष्मी कंपनी पैनगंगा ओपन कास्ट विरूर गाडेगाव यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. ह्या कंपनी वर कायदेशीर कारवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी आरोपी भावीक लिंबानी याला अटक करुन भादवी २७९, ३०४(अ) या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या नेतृत्वात सपोनि प्रमोद शिंदे करीत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या ऑपरेटर च्या परिवाराचा कायदा नुसार आथिर्क मदत व त्याच्या परिवारातील सदस्याला नौकरी देण्याची मागणी कर्माचाऱ्याकडून करण्यात आल्याने कुटुंबियांना २० लाखांच्या वर उल्लेख आर्थिक मदत केली असल्याचे सांगितले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.