- राजुरा स्वयंसहाय्यता समूहांचे दिवाळी फराळ व साहित्य विक्री स्टॉलचे उदघाटन
राजुरा -
राजुरा तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या दिवाळी निमित्त फराळ, लोणचे आणि मेणबत्त्या, दिवे यांच्यासह दिवाळी सणासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंस सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनूले, कळमना सरपंच व कॉंग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, उमेदच्या संध्या डोंगरे, लक्ष्मी सहाय्यता समूहाच्या शीला जाधव, मंगला सोनटक्के, कळमना व लक्कडकोट येथील समूहाच्या सदस्या उपस्थित होत्या.
या उदघाटन प्रसंगी बोलतांना पंचायत समितीचे उपसभापती मंगेश गुरनूले म्हणाले की, दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने सर्व काम सांभाळून विविध फराळाचे बनविणे महिलांसाठी जिकरीचे होऊन जाते. कळमना येथील महिलांनी स्वच्छता राखून आणि चांगल्या प्रतीचा माल वापरून खमंग व सुग्रास फराळाचे पदार्थ बनविले आहेत तसेच लक्कडकोट येथील महिलांनी विविध प्रकारचे चटकदार लोणचे बनविले आहेत. ग्रामीण महिलांनी बनविलेल्या या फराळ व वस्तूंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन मंगेश गुरनूले यांनी केले.
या उदघाटन प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक संध्या डोंगरे, व्यवस्थापक नरेंद्र नगराळे, नोविद भडके, माधुरी पडवे, अमित भगत, विश्वास बोधे, शीला जाधव, स्नेहा आस्वले, मंगला रामटेके, सुचिता धांडे, मनिषा आस्वले, स्मिता आस्वले, कविता इदे, मनिषा चिंचोलकर, संगीता आस्वले,मनिषा धांडे यांचेसह अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.