राजुरा -
सतत होत असलेल्या नापिकाला कंटाळून आलेल्या वैफल्यातून वरुर रोड व रानवेली येथील जीवनयात्रा संपविणाऱ्या कुटुंबियांच्या घरात आशेचा किरण जागविण्यासाठी एक हात मदतीचा पुढे करीत राजुरा महसूल कर्मचारी संघटनेने दिवाळीच्या पर्वावर आर्थिक मदत केली आहे.
अनंत जन्माची जमिनीशी नाळ जुळलेल्या शेतकऱ्यांना बदलत्या निसर्गाच्या चक्रामुळे अनेक संकटांना समोर जावे लागत आहे, घरात आठराविश्व दारिद्र असताना डोक्यावर कर्जाचे डोंगर घेऊन चालताना नकळत नैराश्यपूर्ण जीवन अंतिम टोकावर जात असल्याने संपूर्ण परिवार अंधारमय होत असतात अशावेळेस आपल्याला समाजाचे काही देणे आहे या भावनेतून चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या संकल्पनेने प्रेरित होऊन राजुरा महसूल कर्मचारी संघटनेने वरुर रोड व रानवेली येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करीत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी राजुरा तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार अनिल काळू, हेमंत उमरे, संजना झाडे, सुनंदा नांदेकर, सोनाली लांडे, प्रभाकर गिज्जेवार, कडुकर, गुरू गेडाम, मनीषा मट्टे, आक्रोश जुलमे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.