Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दिवाळी सणाला मिळणारी साखर स्वस्त धान्य दुकानातून गायब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिवाळीत सर्वसामन्याचे तोंड गोड करण्याचा शासनाला पडला विसर अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन -  सार्वजनिक वितरण प्रणाली अंत...
  • दिवाळीत सर्वसामन्याचे तोंड गोड करण्याचा शासनाला पडला विसर
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन - 
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दर दिवाळीला शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एक किलो प्रती कार्ड साखर दिली जाते. परंतु सर्वसामान्य जनतेचे मात्र या दिवाळीत तोंड गोड होणार नाही कारण शासनाला याचा विसर पडल्याने नागरिकांत कमालीची निराशा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे अगोदरच सामान्य नागरिकांचे रोजगार बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच दररोज होणारी इंधन दरवाढीमुळे ही महागाई डोके वर करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होताना दिसत आहे मात्र सार्वजनिक वितरण अंतर्गत सणासुदीला साखर, खाद्यतेल, डाळी दिल्या जात होती परंतु यावेळेस तत्सम वस्तू उपलब्ध झाल्या नसून शासनाच्या या धोरणामुळे सामन्याचा तोंडातील गोडावा हिसकविल्याचे चित्र दिसून येत आहे. 
सध्या दरमहा अंत्यदोय योजनेतील लाभार्थ्यांना 20 किलो तांदुळ, 15 किलो गहू व 1 किलो साखर प्रती कार्ड व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू दरमहा मिळते तसेच मागील मे महिन्यापासून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून प्रती व्यक्ती 5 किलो धान्य मिळत आहे त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाला याचा लाभ मिळाला. मात्र या दिवाळीत जर स्वस्त धान्य दुकानातून साखर मिळाली असती तर सर्वसामान्यांच्या आर्थिक भार कमी होत होता असे नागरिकांत बोलल्या जात आहे. 
शासनस्तरावरून साखर जिल्यात उपलब्ध झाली नसल्याने प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना साखर मिळणार नाही परंतु अंत्यदोय योजनेतील लाभार्थ्यांना 1 किलो साखर दिली जाणार आहे व समोर शासनस्तरावरून काही निर्देश निर्देश आले तर नीट अमलबजावणी केली जाईल. 
एस.बी. भराडी
जिल्ह्या पुरवठा अधिकारी चंद्रपूर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top