Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्रात वन अधिकाऱ्यांचे कोंबिंग ऑपरेशन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सह सर्व वन कर्मचाऱ्यांनी सुमठाणा, तुलाना, टेंभुर...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सह सर्व वन कर्मचाऱ्यांनी सुमठाणा, तुलाना, टेंभुरवाही व सिर्सी गावा शेजारील कक्ष क्र 166, 167, 168, व 169 मधीलह वन क्षेत्रात सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन करण्यात आला. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वना लागतची इलेक्ट्रिक लाईन, मोटर पंप तपासणी, अवैध वृक्षतोड, वन जमिनी वर होणारे अतिक्रमण या बाबत ह्या परिसरातील वन सीमा तपासून पहिल्या तसेच शेतातील शेतकरी व मजुरांशी वाघा चे अस्तित्व बाबत अवगत करून नागरिकांना सतर्कतेबाबाबत  सूचना देण्यात आल्यात. 
कोंबिंग ऑपरेशनमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, क्षेत्र सहाययक संतोष संगमवार, वनपाल जगताप, वनरक्षक दिलीप जाधव, चंदेल, कौरासे, सुलभा उरकुडे, प्रियांका जावळे, मीरा राठोड, वानखेडे, सुनील मेश्राम तसेच सर्व वनमजुर व रोजंदारी वनमजुर सहभागी झाले होते. दैनंदिन गस्त व्यतिरिक्त कोंबिंग अभियान दर महिन्यात 2 ते 3 वेळा परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी समुहीक रित्या करीत असतात हे येथे विशेष. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top