Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पिताच्या डोळ्यासमोर तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू ; उपरवाही येथील घटना - गावात शोककळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - उपरवाही अंबुजा सिमेंटला लागून असलेल्या उपरवाही येथील शेतकर्याच्या तरुण मुलाचा शेतात फवार...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
उपरवाही अंबुजा सिमेंटला लागून असलेल्या उपरवाही येथील शेतकर्याच्या तरुण मुलाचा शेतात फवारणी साठी शेतालगतच्या नाल्यातुन बैलबंडीने पाणी नेत असताना बैलगाडी पाण्यात पलटी झाल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार उपरवाही येथील शेतकरी किसन मटाले व त्यांच्या मुलगा पवन मटाले हे रविवार दि. 12 सप्टें. ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास शेतात फवारणी साठी बैलगाडी वर ड्रम घेऊन नाल्यावर पाणी भरण्यासाठी गेले होते. खोल पाण्यात गड्डा असल्यामुळे बैलगाडी  सुलार होऊन खोल पाण्यात बुडाली व बाप लेक दोघेही पाण्यात पडले. वडील किसन मटाले पोहून बाहेर निघाला पण मुलगा बुडुन मरण पावला. पवन किसन मटाले वय १७, रा. उपरवाही असे मृत तरुणाचे नाव आहे. बातमीमिळताच राजुरा पोलीसांनी मृतकला पोस्ट-मारटम करीता राजुराला पाठवले आहे. पिताच्या डोळ्यासमोर आपल्यातरुण मुलाचं मृत्यू झाल्याने पूर्ण गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top