Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी - सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एन्यूटी हायब्रीड अंतर्गत भोयगाव-गडचांदुर व नारंडा फाटा-पवनी रस्ता मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केला आनंद नारंडा ग्रामपंचायततर्फे सुधी...
  • एन्यूटी हायब्रीड अंतर्गत भोयगाव-गडचांदुर व नारंडा फाटा-पवनी रस्ता मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केला आनंद
  • नारंडा ग्रामपंचायततर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
  • पिपरी व भोयगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
भारतीय जनता पार्टी हे समाजाच्या अंतिम घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्ष्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी असे  प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी ते भारतीय जनता पार्टीच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
कोरपना तालुक्यातील पिपरी व भोयगाव येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पिपरी येथील महादेव पावडे, रफीक खा पठाण, विजय ढवस, संतोष चालेकर, गजानन तुरणकर, देवीदास काकडे, उमेश तुरणकर तसेच भोयगाव येथील दिनेश दवंडे, दत्तू पोटे, पिंटू लवाडे, दत्तू वांढरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. 
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे ग्रामपंचायत मध्ये ९ पैकी ७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली,तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी नारंडा येथे भारतीय जनता पक्षाचे स्वबळावर सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे त्याबद्दल ग्रामपंचायत नारंडा तर्फे लोकलेखा समितीचे अध्यक्ष,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हार टाकून सत्कार केला.
तसेच यावेळी नारंडा ते शेरज खुर्दच्या  पूल व रस्त्याकरिता ३ कोटी रुपये व नारंडा येथील पोचमार्गाच्या रस्त्याकरिता १ कोटी रुपये निधीची मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली सदर मागणीच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करू असे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
तसेच एन्यूटी हायब्रीड अंतर्गत  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भोयगाव ते गडचांदुर व नारंडा फाटा-अंतरंगाव-कवठाळा-पवनी रस्ता मंजूर होऊन काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी यावेळी आंनद व्यक्त केला.तसेच कोरपना तालुक्यातील एन्यूटी हायब्रिड अंतर्गत सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी  आशिष ताजने यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच बोरगाव इरई येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान होते. त्यांना सोलर बॅटरी मशीन देण्यात यावी याकरिता उपवनसंरक्षक यांना सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे निर्देश देण्यात आले.
तसेच भारोसा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आधीपासून वर्ग २ असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करायला अडचणी निर्माण होतात. याकरिता वर्ग १ होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली. त्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांना शिबीर घेण्यासाठी सांगितले. या वेळी नारंडा, पिपरी, भोयगाव, भारोसा, इरई, बोरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व  नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
नारंडा येथील सरपंच अनुताई ताजने, उपसरपंच बाळा पावडे, भारोसा सरपंच देवराव निमकर, नारंडा माजी सरपंच वसंता ताजने, पिपरी माजी सरपंच कवडू कुंभारे, भोयगाव माजी सरपंच बंडू जुनघरी, माजी सरपंच विठ्ठल उपरे, भारोसा माजी सरपंच संभाजी निखाडे यांची उपस्थिती होती.
नारंडा व पिपरी येथील अनिल मालेकर, अजय तिखट, सत्यवान चामाटे, प्रवीण हेपट, अनिल शेंडे, अनिल चांदेकर, भाऊजी तिखट, साईनाथ तिखट, वैभव तिखट, अरुण निरे, गजानन चतूरकर, रवींद्र कांबळे नारंडा ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे, रंजना शेंडे, शालिनी हेपट, परसूटकर उपस्थित होते.बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण नवले, गोकुळदास बुच्चे, नरेंद्र धाबेकर, विजय देवतळे, खुशाल नगराळे,प्रमोद दरेकर, उत्तम वनकर,मधुकर, श्रीकांत बुच्चे, भारत पथाडे, सूर्यभान धाबकेर उपस्थित होते.
भारोसा येथील बापूराव मटाले, रामचंद्र आगलावे, अंकुश मटाले, रामदास रोगे, श्रीधर रोगे, संतोष गोरे उपस्थित होते. इरई येथील राहुल पायघन, अनिल गेडाम, स्वप्नील वरारकर, विठ्ठल बोबडे, महेश मांदाडे उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top