Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जाणून घ्या पर्युषण पर्व आणि मिच्छा्मी दुक्कडम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर...
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर संप्रदायात भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व येते. त्यांचे हे पर्व आठ दिवस चालते. त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे लोक हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ते ‘दसलक्षण’ या नावाने संबोधतात. 
जैन धर्मामध्ये वर्षभर कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी पर्युषण पर्वाच्या अंतिम दिवशी म्हणजे, संवत्सरीला मागितली जाते. त्याला ”मिच्छा् मी दुक्कडं” असे म्हटले जाते. प्राकृत भाषेतील या वाक्याचा अर्थ, मी केलेल्या चुकांबद्दल आपली माफी मागतो, असा आहे. तीर्थंकर भगवान महावीर यांनी उपदेश केलेले अलौकिक सूत्र आहे. हे सूत्र म्हणजेच चेतनेला दोषमुक्त करण्याची प्रक्रिया होय. 
हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पर्यावरणाप्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी ‘कल्पसूत्र’ या तत्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा-अर्चना, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सानिध्यात घालविला जातो. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला जातो. 
मंदिर परीसरात अधिक वेळ घालवणे हे शुभ मानले जाते. दीपावली आणि नाताळासारख्या आनंदोत्सवाचा हा सण नाही. तरीही त्याचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडलेला असतो. हजारो लोक काहीही न खाता निरंकार उपवास करतात. त्याचप्रमाणे निरंकार तपस्या करणार्‍या हजारो लोकांना या पर्वाचे महत्त्व समजले आहे. भारताशिवाय इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी व इतर देशांतही हा सण आनंदाने साजरा केला जातो. 
या पर्वातील क्षमावाणीच्या कार्यक्रमामुळे जैन धर्माशिवाय इतर समाजातील लोकही त्यापासून प्रेरणा घेतात. विश्व-मैत्रीच्या दिवशी हा पर्व साजरा केला जातो. गणेश चतुर्थी किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून स्वत: केलेल्या पापांला झिडकारून आणि भविष्यात त्यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतात. त्याचबरोबर सर्व सजीवांची क्षमा मागून आपले कुणाशीही वाईट नसल्याचे दर्शवितात. पर्यावरणात आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत असा संकल्प ते करतात. कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यासाठी ते स्वत: सहभागी होत नाहीत आणि दुसर्‍यालाही सहभाग घेण्यास सांगत नाहीत. यामुळेच त्यांचे कुणाशीही वाईट नसते. त्यांनी विश्वातील सर्व सजीवांना क्षमा केली असून त्या सजीवांना क्षमा मागणार्‍यांनी घाबरू नये असेही ते जाहीर करतात. 
आपण क्षमा केल्यामुळे सर्व सज‍ीवांना अभय देऊन त्यांच्या रक्षणाचा संकल्प केला पाहिजे. तेव्हा आपण संयम आणि विवेकाचे अनुसरण, आत्मिक शांतीचा अनुभव घेऊ शकता. सर्व सजीवांप्रती मैत्रीची भावना ठेवू शकता. आपण बाहेर कुठेही हस्तक्षेप न केला आणि बाहेरील तत्वापासून विचलित न झाल्यास आत्मा शुद्ध होऊ शकतो. क्षमा-भाव हा याचा मूलमंत्र आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top