Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "मुलगी पटत नाही आहे, आमदार साहेब मला गर्लफ्रेंड मिळवून द्या" पत्र लिहिणारा मिळाला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्या मुलाचा 2 दिवसापासून सुरू होता शोध माफीनाम्याने प्रकरण झाले शांत वाचा सविस्तर कोण, कुठचा होता तो धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिध...
  • त्या मुलाचा 2 दिवसापासून सुरू होता शोध
  • माफीनाम्याने प्रकरण झाले शांत
  • वाचा सविस्तर कोण, कुठचा होता तो
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आमदार साहेबांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याची मागणीकरणाऱ्या मुलाचा 2 दिवसापासून शोध सुरू होता. दारू विकणाऱ्याना मुलगी पटते पण मला नाही, आमदार साहेब जरा लक्ष द्या, असा मजकूर लिहत थेट आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहणारा भूषण आमदार धोटे यांना सापडला.
भूषण राठोड ने त्या पत्राबाबत खुलासा करताना सांगितले की पत्र व्हायरल माझ्या मित्रांनी केले, गंमतीचा भाग म्हणून ते पत्र लिहण्यात आले मात्र ते इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार याची जराही कल्पना मला नव्हती. आमदार धोटे हे माझ्या वडिलांसारखे आहे, आमच्या मतदार संघात त्यांनी खूप कामे केली आहे, त्यांचं मन दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो. ते पत्र व्हायरल झाल्यावर आमदार धोटे यांनी त्या युवकाला शोधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते त्यानंतर हा युवक आमदार धोटे यांच्या कार्यकर्त्यांना चंदनवाही येथे गवसला. मुलगी पटत नाही आहे, आपण काही उपाययोजना करून मला गर्लफ्रेंड मिळवून द्यावी अश्या प्रकारचे लिखाण त्या पत्रात करण्यात आले होते.
मात्र आता भूषणच्या माफीनाम्याने प्रकरण शांत झाले असले तरी आमदार धोटे यांना काही वेळासाठी का होईना, पण मोठा मनस्ताप जरूर झाला होता. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top