Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू - हंसराज अहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घरोटे यांच्या नेतृत्वात सास्ती-कोलगाव युजी टू ओसी प्रकल्पाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिष्टमंडळाने घेतली भेट आमचा विदर्भ - ब्युरो...
  • घरोटे यांच्या नेतृत्वात सास्ती-कोलगाव युजी टू ओसी प्रकल्पाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिष्टमंडळाने घेतली भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सास्ती-कोलगाव युजी टू ओसी प्रकल्पाशी निगडित समस्यांचे निराकरण करावे या मागणीला घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख अडचणीबाबत लवकरच वेकोलि मुख्यालयात बैठक घेऊ तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या खाणीतील कोळसा खरेदी बाबतचा प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असे माजी केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आश्वस्त केले.
पोनी 3 प्रकल्पातील प्रकल्प ग्रस्त मुलं आणि मुलींच्या नोकरीचे पोस्टिंग दुसऱ्या क्षेत्रात देत असल्याचे संदर्भात काही प्रकल्प ग्रस्ताणी भाजपा किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष राजू घरोटे यांचे नेतृत्वात माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत विनंती केली. यापूर्वी सुद्धा 15 प्रकल्प ग्रस्तांना नागपूर क्षेत्रात देण्यात आले होते तेंव्हा हंसराज अहीर यांच्या माध्यमातून त्यांना परत बल्लारपूर क्षेत्रात देण्यात आले होते. तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना नागपूर येथे ईंडक्शन ट्रेनिंग चा विषय उपस्थित झाला तेंव्हा अहीर यांच्या सूचनेनुसार ही ट्रेनिंग नागपूर, चंद्रपूर, वणी अशी तीन सेंटर ला विभागून देण्यात आली व सर्व क्षेत्रातील प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळाला. सध्यस्थितीत चंद्रपूर क्षेत्रात पोस्टिंग देण्यात आलेल्या बॅच चे संदर्भात काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार व निर्देशक (कार्मिक) नागपूर मुख्यालय यांचेशी संपर्क केल्यानंतर या बॅच चे प्रकल्पग्रस्तांना दूरचे क्षेत्रा ऐवजी लागून असलेल्या चंद्रपूर क्षेत्रात पोस्टिंग देण्यात आले आहे परंतु महिलांना वणी क्षेत्रात देण्यात आले आहे जे की महिलांचे नोकरी करण्याचे संदर्भात अत्यंत त्रासाचे आहे. त्यामुळे अहीर यांनी या संदर्भात नागपूर मुख्यालयात बैठक लावून मार्ग काढण्याबाबत आश्र्वासित केले तसेच या सर्व समस्यांबाबत पत्र सुद्धा मुख्यालयाला पाठवण्यात आले आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top