Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मिथिलेश पांडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स बल्लारपूर - बल्लारपूरचे मिथिलेश पांडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हा सरचिटणीसपदी न...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बल्लारपूर -
बल्लारपूरचे मिथिलेश पांडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती राज्याचे माजी अर्थमंत्री, सध्याचे लेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजय दुबे यांच्या शिफारशीनुसार युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांनी पांडे यांनी केलेले काम पाहता त्यांची नियुक्ती केली. पांडे यापूर्वी जिल्हा सचिव दोन वेळा विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष आणि संयोजकांची जबाबदारीही सांभाळत होते.
पांडे यांची सरचिटणीसपदी नियुक्तीझालाबद्दल परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतविंदरसिंग दारी, तालुका अध्यक्ष गुलशन शर्मा, गोपाल रेड्डी, कामगार नेते कैलाश गुप्ता, सुजित निर्मल, भाजपा शहर सचिव मनीष रमिला, अशोक सोनकर, श्रीकांत उपाध्याय, श्रावण मोग्रम, रिंकू गुप्ता, आबिद भाई इत्यादींनी शुभेच्छा दिल्या आहेत.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top