Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमलनाला वेस्ट वेअर बनतेय मृत्यूचे ठिकाण.... अमलनाला वेस्ट वेअर मध्ये बुडून 2 युवकांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेच...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतकांची नावे नदीम फिरोज अली वय 21 बल्लारपूर, तोफिक निसार शेख वय 22 विहिरगाव अशी आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सदर ठिकाणी बऱ्याच वेळा दुर्घटना घडली आहे. मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top