घुग्घुस -
सोमवार 13 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता दरम्यान येथील अनिकेत नागेश नलभोगा रा.विद्या टॉकीज जवळ घुग्घुस या युवकाने राहते घरी कोणीच नसल्याने लोखंडी रॉडच्या सिलिंगला नायलनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच सहा.पो.नि. संजय सिंग पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, निलेश तुमसरे, पढाल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविला. घुग्घुस पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.