Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डारसल कंपनीच्या चालकांना मिळेल न्याय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा कामगार मोर्चाच्या शिष्टमंडळाला वेकोलि प्रशासनाचे आश्वासन भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेत...
  • भाजपा कामगार मोर्चाच्या शिष्टमंडळाला वेकोलि प्रशासनाचे आश्वासन
  • भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली भेट 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
डारसल कोल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कामगारांच्या शिष्टमंडळाने गोवरी उपक्षेत्रीय व्यवस्थापक जी. प्रसाद रेड्डी, वयक्तिक व्यवस्थापक सुमन यांची भेट घेतली आणि त्यांना डारसल कोल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकांच्या शोषणाबद्दल माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापकाला सांगण्यात आले की डारसल कंपनीने किमान वेतन, पीएफ, मासिक रजा, 12 तास काम, बेकायदेशीरपणे पगार कापला, काढून टाकणे, मारहाण करणे, व्हीटीसीशिवाय आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी विषयांवर चालकांचे शोषण कसे सुरू आहे. चालकांचे शोषण थांबवून त्यांना न्याय दिला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप कामगार मोर्चाने बैठकीत दिला. यावर उपप्रादेशिक व्यवस्थापकाने आश्वासन दिले की दहा दिवसांच्या आत तपासानंतर नियमानुसार न्याय मिळेल तसेच डारसलच्या प्रतिनिधींना कायदा हातात घेऊ नये तसेच वाहनचालकांशी नियमानुसार वागण्याचा इशारा दिला.
याप्रसंगी आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशावरून भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजयुमो अध्यक्ष आशीष देवतळे, भाजपा ट्रांसपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, कामगार नेता कैलाश गुप्ता, जिल्हा भाजयुमो महामंत्री मिथिलेश पांडे, मनीष रामिल्ला यांनी व डारसल कोल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कामगारांच्या शिष्टमंडळाने वेकोली बल्लारपूर क्षेत्र गोवरी उपक्षेत्रीय व्यवस्थापकांची भेट घेत सदर माहिती दिली. यावेळी अशोक सोनकर, श्रीकांत उपाध्याय, मोहित डंगोरे, रिंकू गुप्ता, कौसर खान, रवि चिलका, क़ादिर सिद्दीकी आदींसह मोठ्या संख्येने त्रस्त चालक उपस्थित होते. तर डारसलच्या वतीने जयराम यादव, जितेंद्र बन्सल उपस्थित होते.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top