- मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांची केली मागणी
बल्लारपूर -
बल्लारपुर तालुक्यातील येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड पावसा अभावी खराब झालेला असुन रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठ मोठठे खडडे पडले आहे. यामुळे या रस्त्या वरून येजा करणाऱ्यानां प्रवाशांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्यामुळे कधी काळी मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याकडे संबंधित विभागाचे लक्ष नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. सबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन येन बोड़ी किन्ही मानोरा या मुख्य मार्गाचे नुतनीकरन या सात दिवसाच्या आत करावे अन्यथा मनसेकडून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार संबधीत प्रशासन असेल हे निवेंदन उपविभागीय अभियंता बल्लारपुर यांना देन्यात आले. यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, महिला सेना तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार, मनविसे शहर अध्यक्ष प्रवीण दासरप, कृष्णा पोतर्लावार, सचिन दाहिकार, मनसे शहर उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.