Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मानोली बूज येथे लसीकरणाला उत्फुर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - मानोली बूज प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बूज व ग्रामपंचायत माणोली बूज च्या संयुक्त विध्यमाना...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मानोली बूज प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बूज व ग्रामपंचायत माणोली बूज च्या संयुक्त विध्यमानाने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा माणोली बूज येथे
कोविशिल्ड लस दिली जात आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाईल. तसेच हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करचा प्रलंबित डोस दिला जाणार आहे. पहिला डोस ऑनस्पॉट सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहील. लस उपलब्धतेनुसार पहिला व दुसरा डोस...
ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची सुविधा आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व क्षेत्रात लसीच्या उपलब्धतेनुसार शिवाय सुक्ष्म कृती आराखड्यानुसार कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबत अडचण असल्यास ०२३८२- २२३००२ या कोविड हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन सामुदायिक आरोग्य अधिकारी  डॉ. मीरा वजीर मॅडम  यांनी केली आहे. ग्रामपंचायत सचिव कुमारी. जयश्री चांदनखेळे, शिपाई ग्रा. पं. माणोली बूज श्री. सुधाकर विरुटकर, अंगणवाडी सेविका रत्नमाला बाबूंराव कांनाके  व आरोग्य साहाय्य संजय चिडे, आरोग्य सहाइका पदमावर मॅडम आरोग्य सेवक शास्त्रकार साहेब, आ. से वाकुडकर, आ. से आमळे व सर्व प्रतिथमि आरोग्य केंद्र कढोली बूज सर्व चमू. उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top