- पांढरपौनी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षाची ग्रामपंचायत
- काँग्रेस पक्षाचा ग्रामपंचायतीत नागरिकांचा कौल शेतकरी संघटनेकडे
गडचांदूर -
राजुरा तालुक्यातील महत्वपूर्ण व मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांढरपौनी या गावी आज दिनांक 15 सप्टेंबर ला झालेल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदावर शेतकरी संघटनेचे आनंदराव वैरागडे हे शंभर मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे येथे कॉंग्रेस पक्षाची ग्रामपंचायत असून नागरिकांनी मात्र शेतकरी संघटनेला कौल दिला आहे.
आज झालेल्या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी शेतकरी संघटनेतर्फे उभे असलेल्या आनंदराव वैरागडे यांना 301 मते मिळाली आणि कॉंग्रेसचे मारोती बोढेकर यांना 201 मते मिळाली. सभाध्यक्ष यांनी 100 मतांनी वैरागडे विजयी झाल्याचे घोषित केले. विजयी उमेदवाराचे शंकर खनके, भिवसन गायकवाड, राजू गिरसावळे, नरेंद्र मोहारे, बाबुराव लोखंडे, पुंडलिक जीवतोडे, संतोष जीवतोडे, संदीप गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक विलास देवाळकर होते. ग्रामसेवक अनिल नारनवरे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सभेसाठी सुमारे सहाशे लोक उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.