- 105 वर्षीय धोंडुजी मोटघरे यांचा सत्कार माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला सत्कार
राजुरा -
तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक धोंडूजी गोविंदा मोटघरे यांनी वय १०५ वर्ष वयाच्या १०५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या चारही मुलांनी सत्कार समारंभाचे आयोजन दि.१४ केले होते याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बोलताना सांगितले की परमेश्वराचे रूप हे आपल्या घरातच असून खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा केल्यास परमेश्वराची सेवा केल्यासारखे असते. आजच्या स्थितीत बदलत्या जीवनशैली नुसार विभक्त कुटुंब पद्धतीत जीवन जगण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढला असून अशा परीस्थितीत मोटघरे भावंडं आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असल्याने वयाचे १०५ ओलांडताना परिवाराला मोठा आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने भावपुर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी गुलाब महाराज राठोड, ग्रा. पं. सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पायपरे, गोवरी येथील लहू बोरकुटे, पोलीस पाटील पाल, माजी पोलीस पाटील सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी, मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे उपस्थित होते.
गरीब परिस्थिती असतांना सुध्दा प्रत्येक समाजातील युवा पिढीला मार्गदर्शक ठरावा असा स्तुत्य कार्यक्रम घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत वडिलांचे ऋण फेडल्याबद्धल नातेवाईक व गावकऱ्यांनी धोंडुजी मोटघरे यांचे मुलं मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, जनार्धन मोटघरे, रामचंद्र मोटघरे यांचे अभिनंदन केले. यावेळी मोटघरे परिवाराच्या वतीने गावभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दीपक झाडे यांनी तर आभार सुरेश उरकुडे यांनी केले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.