- जिवंतपणीच आई-वडिलांची सेवा करण्याचा संदेश
राजुरा -
दिनांक 14 सप्टेंबर 2021 ला निंबाळा येथील जेष्ठ नागरिक धोंडू पाटील मोटघरे यांच्या 105 व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या सुदृढ दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोटघरे परिवाराने म्हाताऱ्या वडिलांचा वाढदिवस उत्साहात साजरा करुन त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवण्याचा व त्यांची सेवा करण्याचा संकल्प केला. त्यांच्या संकल्प व सेवेबद्दल गावातील समस्त नागरिकांनी त्यांचा हा आदर्श घ्यावा आणि जिवंतपणीच आई-वडिलांची सेवा करावी, माणुसकीचे दर्शन घडवावे असे आवाहन सरपंच नंदकिशोर वाढई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.