Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ‘गाव-वॉर्ड तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ घोषवाक्यानुसार राजुरा तालुक्यात भगवं वादळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
साखरी, अहेरी, बोडखा, साखरवाही, मानोली (बूज.) नंतर आता वरुर पाठोपाठ सुमठाणा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पाचगाव, आर्वी, जिप क्...
  • साखरी, अहेरी, बोडखा, साखरवाही, मानोली (बूज.) नंतर आता वरुर पाठोपाठ सुमठाणा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
  • पाचगाव, आर्वी, जिप क्षेत्रातील सुमठाणा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत घेतला प्रवेश
  • नवयुवकांना शिवसेनेत शामिल करण्याकरिता बबन उरकुडे प्रयत्नशील
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात विधानसभेत ‘गाव-वॉर्ड तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ घोषवाक्यानुसार राजुरा तालुक्यात भगवं वादळ सुरु झाल्याने युवा कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग सुरु आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच लोकांपर्यन्त पोहचलेली शिवभोजन थाळी असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो त्यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासाला प्रेरित होऊन सगळीकडे इनकमिंग सुरु आहे.
आज सुमठाणा येथील तुळशीराम पा. चौधरी, भारत पा. बोरुले, राजकुमार देवाळकर, रोशन मोहुर्ले, स्वप्नील इसनकर, सुरज माणुसमारे दिवाकर साथघरे, परशुराम कोडापे, गणपत टेकाम, मधुकर सातघरे, परशुराम कुळसंगे, रामल कुळसंगे, रुपेश सोयाम, नंदू सोयाम, संतोष माणुसमारे, सोनू मडावी, कुलदीप शेंडे, रामकिशन सोयाम, पुरुषोत्तम चौधरी,राकेश चौधरी, विकास झाडे, प्रवीण सिडाम, अमोल देवाळकर, आशिष बोरुले, लकिरा सातघरे, रामदास सिडाम, सदाशिव चौधरी, प्रणय आत्राम,शशिकला सोयाम, शेवंताबाई मरापे, शेवंताबाई मडावी, लताबाई कोडापे, पौर्णिमा मरापे, सुनीता मडावी,मंगला सोयाम, मालन टेकाम, कल्पना आत्राम, कुसुम सिडाम, उषा मडावी, लता कोडापे, अनिता सोयाम, सारूबाई कोटनाके यासंह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी ग्राप सदस्य अमोल कोसूरकर, मनोज कुरवटकर शाखा प्रमुख पाचगाव, नयन खाडे शाखा प्रमुख अहेरी,सुनील गौरकर युवासेना शाखा प्रमुख पाचगाव, गणेश चोथले युवासेना शाखा प्रमुख आर्वी, विजय भोयर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top