Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलितील खाजगी कंपन्यांच्या चालकांचे काम बंद आंदोलन - वाहतुक ठप्प
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बघा व्हिडीओ  काय म्हणाले इंटक या संघटनेचे नेते आर. शंकरदास आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  राजुरा - वेकोलिच्या बल्लारपुर क्षेत्रात करारबद्ध ...
  • बघा व्हिडीओ  काय म्हणाले इंटक या संघटनेचे नेते आर. शंकरदास
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
राजुरा -
वेकोलिच्या बल्लारपुर क्षेत्रात करारबद्ध केलेल्या सुमारे दोनशे खाजगी गाडी चालकांनी आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. यामुळे आज वेकोलिच्या कोळसा खाणीत अधिकारी व कामगार यांच्यासाठी असलेल्या सर्व चार चाकी गाड्या आणि ट्रक पूर्णपणे बंद होते. 
बल्लारपुर क्षेत्रात असलेल्या सर्व आठही कोळसा खाणीत वाहतुकीसाठी खाजगीकरणाच्या माध्यमातुन गेल्या दहा वर्षापासुन करार पद्धतीने खाजगी वाहने भाडे तत्त्वावर घेण्यात आली आहेत. यासाठी अनेक कंपन्यांची वाहने येथे सेवा देत आहेत. मात्र या गाड्यांवर कार्यरत चालकांना किमान वेतन, नियमानुसार सुविधा देण्यात येत नाही. या मनमानी विरोधात संघटीत होऊन या कंत्राटी कामगारांनी अनेकदा निवेदन देऊन मागण्या केल्या, मात्र कुणीही दखल घेतली नाही. अखेर आज इंटक या संघटनेचे नेते आर. शंकरदास यांच्या माध्यमातुन काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे येथे खळबळ उडाली. फक्त अबूलन्स वगळता सर्वच गाड्या ठप्प होत्या. यामुळे कोळसा खाणीतील कामात व्यत्यय आला. 
या कंत्राटी गाडी चालक सर्व कामगारांना कायद्यानुसार निर्धारित किमान वेतन मिळावे, वेतनाची स्लिप मिळावी, बारा तासाऐवजी कामाच्या आठ तासाची डय़ुटी करावी, योग्य भविष्य निर्वाह निधी कपात करून नियमित पणे कामगाराचे खात्यात जमा करण्यात यावा, नियमानुसार घरभाडे, वैद्यकीय सुविधा सह सर्व भत्ते देण्यात यावे, नवीन कंपनी असली तरी जुन्या चालकांना कामावर ठेवावे, वेतनाची एक तारीख निश्चित करून नियमित वेतन द्यावे, आठवड्यातून एक सुट्टी द्यावी, कुठल्याही तुटफुट अथवा माईलेजच्या कारणास्तव वेतनातून कपात करणे बंद करावे ईत्यादी सह 25 मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य महाव्यवस्थापक यांनी आर. शंकरदास व कामगारांना चर्चेसाठी बोलाविले आहे. मात्र बातमी लिहीपर्यंत काही तोडगा निघाला नव्हता. 
काय म्हणाले इंटक या संघटनेचे नेते आर. शंकरदास बघा व्हिडीओ







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top