Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बदलत्या हवामाना सोबतच शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याची गरज - मनोहरराव चंद्रिकापुरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चळवळीचे नेते पाशा पटेल, आमदार अमोल मिटकरी प्रामुख्याने उपस्थित गडचांदूरात शेतकरी संवाद कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती धनराजसिंह शेखा...
  • चळवळीचे नेते पाशा पटेल, आमदार अमोल मिटकरी प्रामुख्याने उपस्थित
  • गडचांदूरात शेतकरी संवाद कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जागतिक पातळीवर निर्माण झालेली परिस्थिती, शेती व्यवसायावर अभ्यासका भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या यावर चिंतन करीत असून हवामानातील बदल, दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटामुळे निर्माण होत असलेली परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाला अनुसरून  उत्पादन घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती अध्यक्ष तथा आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले ते स्थानिक बालाजी सेलिब्रेशन हाल येथे आज संपन्न झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
गडचांदूरात आज सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा आयोजित शेतकरी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शेतकरी चळवळीचे नेते, अभ्यासक, कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अमोल मिटकरी, सिंधुदुर्ग शेतकरी चळवळीचे नेते शेतकरी कायदेतज्ञ अँड. संजय धोटे, बांबू रिसर्च सेंटरचे संचालक संजीव करपे, सामाजिक कार्यकर्ते आबीद अली, कृषी उपसंचालक मनोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा कृषी अधिक्षक भराडे, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, सवंर्ग विकास अधिकारी पाटील, तालुका कृषी अधिकारी डमाले प्रामुख्याने उपस्थित होते. 
कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आपल्या संबोधनात म्हटले कि, पृथ्वीचे रक्षण व मानव विकासासाठी आवश्यक असलेल्या गरजा भरून काढणे कठीण झाल्याने जगाच्या पातळीवर चिंतन होऊ लागले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे दारिद्य जात नाही आहे तर दुसरीकडे सततची नापिकी, दुष्काळ अश्या संकटाला तोंडही द्यावे लागत आहे. 
वाढलेले प्रदूषण, हवामानात होत असलेले बदल यामुळे अनेक देशांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी जंगलतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे बदलत्या परिस्थिती बरोबरच वाढत्या कार्बनडॉय आक्ससाईड, ऑक्सिजनची कमतरता मानव जीवनाचे आयुष्य कमी करत आहे. अश्या परिस्थितीवर मात करण्याकरिता पर्यावरण संतुलनाची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन घेण्यासाठी विकेल ते पिकेल या सिद्धांतावर वाटचाल करत बांबू लागवड हा नवीन पर्याय शेतकऱ्यांना सार्थकी हितेशी ठरणार आहे असेही पाशा पटेल म्हणाले. 
आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले कि, साधू-संतांनी वृक्षाबद्दल जनजागृती केली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी अशा अनंत संकटानां मात करत शेतकरी उभा राहतो. कोरोना सारख्या परिस्थितीने मानव जीवनाला कशाची गरज आहे दाखवून दिले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आता सर्वांचीच जवाबदारी झाली आहे. अश्या वक्तव्यांनी वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या दुखण्यावर फुंकर घालीत आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित शेतकऱ्यांची मने जिंकली. 
बांबू रिसर्च सेंटर चे संजीव करपे, माजी आमदार संजय धोटे यांनी पण आपले विचार मांडले. आबिद अली यांनी रोजगार हमी योजनेतील अटी शिथिल करून शेतकऱ्यांना फळबाग, वृक्ष लागवड, बांबू लागवड या कार्यक्रमासाठी रोहयो अंतर्गत 10 हेक्‍टरपर्यंत मर्यादा देण्याची मागणी केली.  
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण काकडे, आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरपना तालुका अध्यक्ष सोहेल अली यांनी मानले. यावेळी शरद जोगी, अजहर शेख, शंकर ठावरी, श्रीनिवास मुसळे, इरफान शेख, इमरान कुरेशी यांचेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीच्या या शेती समृद्धीचा नवीन पर्याय कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top