Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आता राजुरा शहरातही शिवसेनेचे भगवे वादळ सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजूरा शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे ...
  • राजूरा शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिप गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले. येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख, नगरसेवक राजू डोहे व राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार यांच्या नेतृत्वात राजुरा येथील इंदिरा नगर परिसरातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. प्रवेश घेणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचे राजू डोहे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले.  
याप्रसंगी राजूरा विधानसभा संघटक नरसिंग मादर, शहर समन्वयक सुनील लेखराजनी, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे, युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर, माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख राकेश चिलकुलवार, माजी शिवसेना शहर प्रमुख भूवन सल्लम, शिवसैनिक बालू कूइटे, खूशाल सूर्यवंशी, समीर शेख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top