- तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशनचा उपक्रम
कोरपना -
तहसिल कार्यालय कोरपना व अंबुजा फाउंडेशन व्दारा बोंड अळी नियंत्रण संदर्भात शेतकरी बांधवांना योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या पिकाची निगा कशी राखायची या बाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. मौजा लोणी येथिल सतिश मुसळे यांचे शेतात सदर कार्यक्रम घेऊन कृषी सहाय्यक केळकर साहेबांनी शेतकऱ्यांना या संदर्भात योग्य अशी माहिती देण्यात आली. बोंड अळिचा उगम हा पतंग अवस्थेमधुन होतो.तिचा जिवनक्रम हा २८ दिवसांचा असुन याच अवस्थेत पतंगाचा नायनाट केला तर त्याचा फायदा आपणास निश्चीत जाणवेल.असे त्यांनी यावेळी सांगुन पतंगाचा नायनाट करणेसाठी शेतात पिवळे सापळे वापरणे फायद्याचे ठरेल असे सांगितले. पोर्णीमा व अमावश्येला नर व मादिचे मिलनाचा कालावधी असतो, याच काळात योग्य ती औषधी (सल्ल्यानुसार) फवारणी केल्यास यावर आपणास मात करता येईल असेही सांगितली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.