- वरोरा व्यापारी असोसिएशन व चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या प्रयत्नाला यश
चंद्रपूर -
मागील महिन्यात कोविड -19 बचाव विषयी व्यापारी बांधवामध्ये जनजागृती करण्याकरीता चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सदानंद खत्री यांनी वरोरा येथे व्यापारी संघटनेची सभा बोलावून एक महिन्यापूर्वी कार्यकारणी गठीत केली. तसेच येथील सर्व व्यापारी बांधवाना लसीकरण व्हावे अशी सर्वांची ईच्छा होती. यामुळे वरोरा व्यापारी असोसिएशन व चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील व्यापारी बांधवां करीता दिनांक १८ ऑगस्ट रोजी कोविड लसीकरण कार्यक्रम जूनी नगर परिषद बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आला होता. या उद्घघाटन कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री, उपाध्यक्ष प्रकाश पाम्पपट्टीवार, कोषाध्यक्ष अनिल गुप्ता, प्रमुख पाहुणे तहसीलदार बेलसे पाटिल, आरोग्य अधिकारी राठौड़ व मुंजनकर तसेच वरोरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शम्भूनाथ वर्गने, उपाध्यक्ष महेश पोपट, सचिव नितेश जयसवाल, सहसचिव योगेश डोंगरवार, कोषाध्यक्ष शैलेश शुक्ला, सदस्य विनोद शर्मा उपस्थित होते. या लसीकरणाच्या व्यापारी बांधवांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात खत्री यांनी सांगितले कोविड 19 विषयी जनजागृती करून व्यापारी बांधवाना तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशनाचे पालन करून शासकीय अधिकाऱ्यांना मदत करावी असे सांगितले, वरोरा प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे कर्मचारी यांनी सेवा दिल्या बद्दल त्याचे अभिनन्दन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शम्भूनाथ वर्गने यांनी व आभार प्रदर्शन नितेश जयसवाल यांनी मानले. लसीकरण यशस्वी करण्याकरिता महेश पोपट, शैलेश शुक्ला व योगेश डोंगरवार यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी व्यापारी बांधव सोशल डिस्टनसींग चा स्वीकार करुन व मास्क लावून उपस्थित होते.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.