Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घुग्घूस येथील मृतक कुटूंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत केली आर्थिक मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिस अधिक्षकांशीही दूरध्वनी वरून चर्चा शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - घूग्घूस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या मृतक सूरज माने व ...
  • पोलिस अधिक्षकांशीही दूरध्वनी वरून चर्चा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
घूग्घूस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या मृतक सूरज माने व त्यांच्या पत्नी रत्नमाला माने यांच्या कुटुंबियांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे भेट घेतली असून आर्थिक मदत केली आहे. यावेळी  सदर प्रकरणाबाबत आ. जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशीही दुरध्वनि वरून चर्चा केली आहे. 
अमराई वार्डातील सुरेश माने व रत्नमाला माने या दाम्पत्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. त्यानंतर घुग्घूस शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी परिस्थिती पाहता ही हत्त्या असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येते जात मृतकच्या कुटुंबीयांची भेट घेतली या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी याकरिता पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. काही असामाजिक तत्वांकडून परिसरातील नागरिकांसह मृतकच्या कुटुंबियांना भीती असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. घुग्घूस येथे जाऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. सदर कुटुंबियांना घाबऱ्यांची गरज नाही प्रकणाची योग्य चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल असे यावेळी आ. जोरगेवार यांनी आशवस्त करत सदर कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. तसेच अनाथ मुलांचा योग्य रित्या सांभाळ करता यावा करिता मृतकच्या वडिलांना नगर परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीवर नौकरी देण्याबाबतही आ. किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top