Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "बाळू" चे लोकसहभागातून कुपोषणमुक्तीचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे - स्वरूपा झंवर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाळूच्या माध्यमातून इनर व्हील क्लब राजुरा कडून ८ कुपोषित बालकांना पोषण आहाराची भेट इनर व्हील क्लब राजुराच्या सदस्यांनी बाळू सदस्यांना बांधिल...
  • बाळूच्या माध्यमातून इनर व्हील क्लब राजुरा कडून ८ कुपोषित बालकांना पोषण आहाराची भेट
  • इनर व्हील क्लब राजुराच्या सदस्यांनी बाळू सदस्यांना बांधिली राखी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. राज्यापुढील आवाहनांपैकी हेही एक आवाहन आहे. या आवाहनावर मात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे पण आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो याकरिता सर्वांनी कुपोषणमुक्तीच्या चळवळीत सहभाग घ्यावा, जिल्ह्यात "बाळू" चे लोकसहभागातून कुपोषणमुक्तीचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन इनर व्हील क्लब राजुराच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी केले. 
रक्षाबंधनाच्या पर्वावर स्थानिक पंचायत समिती कार्यालयातील हॉल मध्ये आज बाळूच्या माध्यमातून इनर व्हील क्लब राजुरा कडून राजुरा तालुक्यातील विविध ८ कुपोषित बालकांना वर्षभर पुरेल इतकी पोषण आहाराची भेट देण्यात आली. यावेळी स्वरूपा झंवर यांनी कुपोषणमुक्ती साठी बाळूच्या प्रयत्नांचे कौतुक करत  कुपोषणमुक्तीसाठी आम्हा महिलांचाही सहभाग लागावा याकरिता ही भेट देत असल्याचे सांगितले. रक्षाबंधनाच्या पर्वाचे औचित्य साधत इनर व्हील क्लब राजुराच्या महिला सदस्यांनी बाळूच्या सदस्यांना राखी बांधून कुपोषण मुक्तीच्या कार्यात बहीण म्हणुन संपुर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी  इनर व्हील क्लब राजुराच्या अध्यक्ष स्वरूपा झंवर, सचिव शुभांगी वाटेकर, उपाध्यक्ष वृषाली बोनगिरवार, माजी अध्यक्ष कल्याणी गुंडावार, राधा धनपावडे, राधा विमलवार, आसावरी बोनगिरवार, स्मिता बोनगिरवार, कल्याणी मोहरील, नेहा चिल्लावार, कृतिका सोनटक्के, पंस बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, बाळूचे संस्थापक अध्यक्ष व पंस विस्तार अधिकारी अमित महाजनवार, दिपक शर्मा, सागर भटपल्लीवार, अमोल ताठे, अक्षय सुर्तेकर उपस्थित होते. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top