Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ब्रह्मपुरी - ब्रम्हपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मुडझा येथील जंगल परिसरात बोडेगा...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रह्मपुरी -
ब्रम्हपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मुडझा येथील जंगल परिसरात बोडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 216 मध्ये वाघाने एका गुराख्याला जखमी केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. यामध्ये मोना आत्माराम धानोरकर (वय 55) असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. मुडझा येथील मोना धानोरकर हा गुराखी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर अचानक हल्ला करून जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक नागोसे तसेच मुडझा येथील वनरक्षक पी.डब्ल्यू. दाते. व मने यांनी आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह जखमी गुराख्याला आरमोरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी 17 आँगस्ट रोजी डोर्ली येथील गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र तयार झाले आहे. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top