- साखरी नंतर आता अहेरी येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
- शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात इनकमिंग जोमाने सुरु
![]() |
| शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे शिवबंधन बांधून स्वागत करतांना शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे |
राजुरा -
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरु आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यात शिवसेना युवकांची पहिली पसंती बनत आहे. दि. ८ ऑगस्टला राजुरा तालुक्यातील साखरी येथे झालेल्या संपर्क अभियानात असंख्य युवकांनी प्रवेश घेतल्यानंर दि. १८ ऑगस्टला अहेरी येथील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये नयन खाडे, स्वप्नील शेरकी, पंकज उपरे, राहुल शेरकी, राहुल खाडे, राहुल वैरागडे, महेश उपरे, अनिकेत जनपल्लीवर, सुरेश जनपल्लीवर आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, गणेश चोथले, प्रशांत महाकुलकर, मिथुन नुलावार आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण परिसरात व जिल्ह्यातील राजकारणातही शिवसेना भक्कमपणे प्रस्थापित होत आहे. सद्यस्थितीत अन्य पक्ष हतबल, थंड किंवा निस्तेज, निष्प्रभ झालेले दिसत असून मात्र बबनभाऊचा जनाधार वाढताना मात्र दिसत आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.