Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विवेकानंद अनाथाश्रमात ग्रामदुत फाऊंडेशनचे रक्षाबंधन अनाथ समजू नका, आम्ही पाठिराखे - निशा चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विवेकानंद अनाथाश्रमात ग्रामदुतचे फाऊंडेशनचे रक्षाबंधन अनाथ समजू नका, आम्ही पाठिराखे - निशा चटप  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडच...
  • विवेकानंद अनाथाश्रमात ग्रामदुतचे फाऊंडेशनचे रक्षाबंधन
  • अनाथ समजू नका, आम्ही पाठिराखे - निशा चटप 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य फुलावे म्हणून ग्रामदुत फाऊंडेशनने रक्षाबंधनाचा सामाजिक सोहळा साजरा केला. राजुरा येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील मुलांसोबत ग्रामदूत फाऊंडेशनच्या संचालिका निशा चटप यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा करुन सामाजिक बंधुभाव जपला. 
ग्रामदुत फाऊंडेशन नांदाचे अध्यक्ष साहित्यिक रत्नाकर चटप यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचा उपक्रम पार पडला. अनाथाश्रमातील मुलांसोबत प्रेमाचे, बंधुभावाचे नाते दृढ करुन त्यांना भविष्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांचे पाठीराखे म्हणून आपल्याला योगदान देता यावे, ही प्रांजळ भुमीका यावेळी त्यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमीत्ताने ओवाळणी करुन बंधुभाव जपणारी राखी संचालिका निशा चटप यांनी अनाथाश्रमातील मुलांना बांधली तसेच फळवाटप करण्यात आले. या सोहळ्याने भारावून चिमुकल्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाऊराव बोबडे, अँड.दीपक चटप, सुरज गव्हाने, अमोल वाघाडे यांची विशेष उपस्थिती होती. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top