Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी आमदार निमकर यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहिणींकडून केले रक्षाबंधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नात्या पलिकडचा ऋणानुबंध आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - माजी आमदार सुदर्शन निमकर हे 2003 मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच ए...
  • नात्या पलिकडचा ऋणानुबंध
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
माजी आमदार सुदर्शन निमकर हे 2003 मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल खडकी व हिरापूर या गावांत गेले असता या दोन्हीगावतील आदिवासी भगिनींनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते जोपासत कोणतीही पूर्वतयारी नसतांना खडकी येथील गोदाबाई भीमराव मडावी व हिरापूर येथील अंजनाबाई जंगु सोयाम यांनी निमकरांना राख्या बांधल्या. तेंव्हापासून निमकर हे सख्या बहिणीसारखं नातं जोपासत 18 वर्षांपासून अविरतपणे आपल्या सहकाऱ्यांसोबत वरील गावात जाऊन आदिवासी भगिनीकडून राख्या बांधून त्यांना साळी-चोळी भेट देऊन अभिनंदन करतात. यानिमित्तानं दोन्ही गावात बहीण भावाच्या ऋणानुबंधाच वातावरण निर्माण होऊन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व महिला भगिनी व बांधव तसेच बालगोपाल सहभागी होत असल्यामुळे उत्सवाचं वातावरण निर्माण होत असते. आज रविवार दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस.बी. चंदनखेडे, भोक्सापूर ग्रा.पं.चे उपसरपंच गोविंद मिटपल्ले, खडकी चे माजी सरपंच भीमराव पाटील मडावी वयोवृद्ध प्रतिष्ठित मारू पाटील गेडाम, सुभाष राठोड, नारायण जाधव, इमाम खान पठाण, जंगु पाटील सोयाम, पंढरी सलगर, तिरुपती पोले, पाटण येथील प्रभाकर पा. उईके, जयदेव आत्राम महाराज, सचिन उत्तरवार, सलमान खान पठाण सह मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी खडकी येथील वयोवृद्ध आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारू पा. गेडाम यांचा माजी आमदार निमकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top