Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत रामराव महाराज यांना भारतरत्न देण्यात यावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्राकडे तशी शिफारस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - जिवती पंचायत समितीच्या...
  • केंद्राकडे तशी शिफारस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
जिवती पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई भिमराव पवार यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की रामराव बापू हे वयाच्या ९ वर्षापासुन देश सेवेसाठी असलेले अनमोल कार्य तसेच १५ करोड बंजारा समाजाचे एकमेव श्रध्दास्थान (बापु) आहेत. त्यांनी दारूबंदी, हुंडाबळी, अस्पशत: अंधश्रध्दा निर्मुलन, हिन्दू रक्षण, धर्मजागरूती इत्यादी सुधारणेसाठी अहोरात्र कार्य केले आहे. तसेच त्यांनी स्वतःचे आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे बाबत पंचायत समिती सभापती यांनी विनंती केली आहे.
या मागणीची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे  बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे तशी शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top