Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अहेरी येथे सामुहिक रक्षाबंधन व वृक्ष लागवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - आज सकाळी 8.30 वाजता अहेरी येथे अंबूजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीचे विशाल भोगावार, पी.यु. मेनेजर, यांचे ...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आज सकाळी 8.30 वाजता अहेरी येथे अंबूजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीचे विशाल भोगावार, पी.यु. मेनेजर, यांचे मार्गदर्शनात गावातील शेतकरी व युवक-युवती यांचा सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 7 भाऊ 7 बहिणी यांनी कार्यक्रमामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधून एक वृक्ष भेट देते व वृक्ष लागवड करुन त्या झाडाचे संगोपन करशील असे वचन घेते. या कार्यक्रमाचे उदघाटक व मार्गदर्शक सुभाष बोबडे, पी.यु. मेनेजर, रविंद्र बोबडे, महादेव बोबडे, प्रदिप बोबडे प्रक्षेत्र अधिकारी तसेच जयश्री बल्की, करिष्मा, पल्लवी, प्रणाली, आकांक्षा, दिपिका बोबडे, सुधाकर साळवे, भाऊजी, आबाजी, दादाजी, मारोती, सुरेश, गणेश, कमलाकर, प्रभाकर, हर्षल, अजय, कुणाल, निखिल, गौरव बोबडे, रविंद्र पिदुरकर यानी सहकार्य केले. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top