- कोरोना योद्धा अशोक राव यांच्या कामाचे कौतुक करत सत्कार
राजुरा -
कोरोनाचा पहिली व दुसरी लाटेत जनजीवन विस्कळीत झाले होते. परप्रांतीय मजुरांच्या पायी गावाकडे जाण्याचा प्रश्न असो, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण असो, कोरोना चाचणी करण्याकरिता काही मदत हवी असो अथवा लसीकरणाकरिता काही सहकार्य हवे असो तालुक्यात सामाजिक कोरोना योद्धा अशोक राव यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. अशोक राव यांचे कार्य समर्पण, सेवावृत्तीचे आहे असे म्हणत सिंधी गाव चे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबाजी पाटील ढूमने यांनी शाल-श्रीफळ देत अशोक राव यांचा कार्याचे कौतुक करत सत्कार केला. याप्रसंगी लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप ही करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबाजी पाटील ढूमने यांचा ८० वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, पंस माजी सभापती कुंदाताई जेणेकर, पंस सदस्य तुकाराम माणूसमारे, देवाडाचे उपसरपंच जावेद भाई, हेमंत झाडे यांची उपस्थिती होती.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.