Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रायपूर ते हैद्राबाद सायकलने जाणाऱ्या युवकाचे राजुऱ्यात स्वागत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ डोहे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकांनी केले स्वागत आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - रायपूर ते हैद्राबाद...
  • शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ डोहे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकांनी केले स्वागत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
रायपूर ते हैद्राबाद सायकलने जाणाऱ्या रॉकी सरकार या नवयुवकाचे राजूरात भव्य स्वागत करण्यात आले. रॉकी सरकार हा मूळ मुंबईचा राहणार असून तो रायपूर ला जॉब करतो. गिनीज बुकमध्ये आपले नांव याकरिता प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. हा सायकलस्वार युवक सायकलने जात असताना संविधान चौकात स्थानिक शिवसैनिकांना भेटला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ डोहे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकांनी त्याची विचारपूस करत त्याचे पुष्पहार घालत त्याला नाश्ता व फळांच्या ज्यूस देण्यात आला. शिवसैनिकांनी आपुलकी ठेवत विचारपूस, स्वागत व अल्पोपहाराची सोय केल्याबद्दल सायकलस्वाराने आभार व्यक्त करत पुढच्या यात्रेला निघाला. यावेळी शिवसैनिक खुशाल उर्फ मोनू सूर्यवंशी, समिर शेख, विक्की मडावी, व इतर शिवसैनिक उपस्थित होते. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top