Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उत्तम आरोग्यासाठी रानभाज्या महत्वाच्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रानभाजी महोत्सवाचे उदघाटन ; तालुका कृषी विभागाचा पुढाकार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्य...
  • रानभाजी महोत्सवाचे उदघाटन ; तालुका कृषी विभागाचा पुढाकार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यात रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने तसेच रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. 
दिनांक 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव सप्ताहचे आयोजन तालुका कृषी विभागाकडून आयोजित करण्यात आले आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या जसे की, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, कडू इत्यादी भाज्या तर हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोधा इत्यादी, फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी तर फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ व उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व, पाककृती इत्यादी विषयी माहिती शहरी भागातील नागरिकांना तसेच उपस्थित लोकांना देण्यात आली.
यावेळी आमदार सुभाष धोटे, जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, पंस उपसभापती मंगेश गुरनुले, पंस माजी सभापती कुंदाताई जेनेकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तहसीलदार हरीश गाडे, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, निसर्ग महिला गट राजुरा, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही, भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरा, साफल्य शेतकरी उत्पादन कंपनी हरदोना यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण यांनी तर आभार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी केले. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top