Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भद्रावती वनविभागात एसीबीचा सापळा; ₹२० हजारांची लाच स्वीकारताना तिघे रंगेहात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रॅक्टर सोडण्यासाठी मागितली लाच; वनपरिक्षेत्रातील तीन कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई आमचा विदर्भ -  भद्रावती (दि. २७ जुलै २०२६) -         भद्...
ट्रॅक्टर सोडण्यासाठी मागितली लाच; वनपरिक्षेत्रातील तीन कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई
आमचा विदर्भ - 
भद्रावती (दि. २७ जुलै २०२६) -
        भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, बीट वनरक्षक आणि वनमजूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ₹२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर येथील एसीबीच्या पथकाने ही कारवाई भद्रावती येथील वनविभागाच्या कार्यालयात नियोजनबद्ध सापळा रचून केली.

        मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने यापूर्वी एका ट्रॅक्टरवर कारवाई करून तो जप्त केला होता. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत आणि बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी संबंधित ट्रॅक्टर मालकाकडे ₹२० हजारांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
        तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय पडताळणी केली. पडताळणीत तक्रारीतील बाबींना दुजोरा मिळाल्यानंतर पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार, वनमजूर ललित नागपुरे यांच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारली जात असताना एसीबीच्या पथकाने धाड टाकून क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत, बीट वनरक्षक संदीप पारवे आणि वनमजूर ललित नागपुरे या तिघांनाही रंगेहात पकडले.

        या कारवाईनंतर संबंधित आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे वनविभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भद्रावती परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

#Bhadrawati #BhadrawatiNews #Chandrapur #ChandrapurNews #ACB #AntiCorruptionBureau #BriberyCase #ForestDepartment #ForestNews #Corruption #MaharashtraNews #Vidarbha #VidarbhaNews #BreakingNews #LatestNews #CrimeNews #AntiCorruption #LocalNews #MarathiNews #AmchaVidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top