घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. २५ जुलै २०२६) -
हनुमान नगर परिसरातील बिरसा मुंडा चौकाजवळ १६ वर्षीय विद्यार्थिनी कु. ऋतुजा सचिन कुकडे वय १६ हीने घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी सुमारे १.३० ते २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या विद्यार्थिनीने यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिचे वडील राजुरा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असून आई पोलीस विभागात नोकरीला आहे. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील हे कुटुंब सध्या येथील स्वामी विवेकानंद नगर, हनुमान नगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
घटनेच्या वेळी घरात तिचा आठ वर्षांचा भाऊ उपस्थित होता. त्याने याबाबत घरमालकाला माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार यांनी पोलीस पथकासह ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. दरम्यान, विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पोलीस विविध अंगांनी तपास करीत असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
#BreakingNews #StudentDeath #MaharashtraNews #RajuraNews #ChandrapurNews #TeenTragedy #EducationNews #PoliceInvestigation #LatestNews #VidarbhaNews #AmchaVidarbha #LocalNews #Maharashtra #IndiaNews #HanumanNagar #YouthNews #Breaking #NewsUpdate

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.