Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ’कर्नाटका'ची 'नंदिनी' आता विदर्भात !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरच्या 'स्वप्नपूर्ती'शी 20 हजार लिटर दुधाचा करार  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरपना तालुक्याचा लौकिक ...
  • गडचांदूरच्या 'स्वप्नपूर्ती'शी 20 हजार लिटर दुधाचा करार 

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्याचा लौकिक दुग्ध उत्पादनात निर्माण करण्याचा पहिला जोरकस प्रयत्न गडचांदूरच्या दोन तरुण उद्योजकानी केला. बाखर्डी येथे 'स्वप्नपूर्ती फूड प्रा. लि. कंपनी' सुरू केली. या कंपनीचे संचालक निलेश ताजने आणि अभियंता संतोष मोतेवाड यांनी ही कंपनी नावारूपास आणली. आपले दुग्ध उत्पादन अनेक जिल्ह्यात यशस्वीरित्या पोहचविले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे कंपनीला आणखी मोठी संधी चालून आली आहे. 
'कर्नाटका मिल्क फेडरेशन' या भारतातील दुसऱ्या नंबरच्या कंपनीने स्वप्नपूर्ती फूड प्रा. लि. कंपनी' सोबत व्यावसायिक करार केला आहे. कर्नाटका मिल्क फेडरेशनच्या 'नंदिनी' या ब्रँडचे दर महिन्याला 20 हजार लिटर दुग्ध उत्पादन करून देणार आहे. या नंदिनी ब्रँडचे विदर्भात लॉन्चिंग झाले आहे. हा कार्यक्रम नागपूर येथील रेडिसन ब्लु या पंचतारांकित हॉटेल मध्ये नुकताच झाला. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटक सरकारमधील मंत्री तसेच कंपनीचे अधिकारी यांच्यासह 'स्वप्नपूर्ती फूड प्रा. लि. कंपनी'चे संचालक गडचांदूरचे निलेश ताजने आणि जिवतीचे इंजि. संतोष निवृत्ती मोतेवाड उपस्थित होते. कोरपना तालुक्यातील दुग्ध उत्पादनाला झळाळी मिळण्याची संधी या उद्योजकांमुळे प्राप्त झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top