आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर / कोरपना (दि. ४ नोव्हेंबर २०२६) :
काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या तुराणकर पिता-पुत्रांनी पुन्हा शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत सुभाष काका तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी भाजपला रामराम ठोकत शेतकरी संघटनेत घरवापसी केली. कोरपना येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे कोरपना परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे सुभाष काका तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी पुन्हा आपल्या जुन्या संघटनेत परतण्याचा निर्णय घेतला. मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी शेतकरी संघटनेत अधिकृतपणे प्रवेश केला.
माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना येथे पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत तुराणकर पिता-पुत्रांनी पुन्हा शेतकरी संघटनेशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्याला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मुसळे, श्रीमती रमा पाटील मालेकर, अनंताभाऊ गोडे, अविनाश मुसळे, नादिर कादरी, शारीक अली, संदीप टोंगे, गणेश तुराणकर, गणपत गोडे, प्रवीण रासपल्ले आणि सौरभ राऊत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या समक्ष सुभाष काका तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी शेतकरी संघटनेत पुन्हा प्रवेश केला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या पुनरागमनामुळे संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण असून या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. संघटनेचे नेतृत्व, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या घरवापसीमुळे कोरपना परिसरात संघटनेच्या संघटनात्मक बांधणीला नव्याने बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#ChandrapurNews #KorapnaNews #ChandrapurPolitics #ShetkariSanghatana #WamanraoChatap #SubhashTurankar #IshwarTurankar #BJP #PoliticalNews #VidarbhaNews #MaharashtraPolitics #कोरपना #चंद्रपूर #चंद्रपूरबातम्या #शेतकरीसंघटना #वामनरावचटप #तुराणकर #राजकीयघडामोडी #भाजपा #घरवापसी #आमचाविदर्भ

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.