Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कापसी मार्गी जाणारी नेर बस बंद केल्याने विद्यार्थीची गैरसोय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बस सुरू करण्याची विद्यार्थी व पालकांची मागणी रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - नेर-सारंगपुर-कापसी-बोरगाव-यवतमाळ - परत नेर बसच्या ...
  • बस सुरू करण्याची विद्यार्थी व पालकांची मागणी
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
नेर-सारंगपुर-कापसी-बोरगाव-यवतमाळ - परत नेर बसच्या विविध ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या नेर आगाराने लाॅकडाऊन काळामध्ये बंद केल्या होत्या. परंतु आज लाॅकडाऊन खुले करण्यात आले असूनही या मार्गी जाणारी बस अजुनही बंदच आहे त्यामुळे प्रवाशांची व विद्यार्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नेर आगाराच्या तालुक्यात व इतर मार्गे जाणाऱ्या बसेस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. परंतु या मार्गालाच दुजाभाव का असा सवाल या मार्गाच्या गावातील नागरिक करित आहे. वर्ग 8 ते 12 पर्यंतच्या शाळा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत आणि या मार्गावरील अनेक गावातील विद्यार्थी नेर येथे शाळेत आहेत. बस सुरू नसल्याने त्यांना शाळेत जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. खाजगी वाहनाने जाण्याचे झाल्यास अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जाते ते भाडे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना न परवडणारे आहे. तेव्हा या विषयी नेर  आगाराने व वरिष्ठांनी याची दखल घेऊन या मार्गाने बस सूरू करावी अशी मागणी विद्यार्थी व नागरिक करित आहे. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top