Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजेचे २०० युनिट मोफत देण्‍याची घोषणा करून पूर्ण न करणाऱ्या आमदाराचा निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२०० युनिट मोफत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील - देवराव भोंगळे शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीपूर्वी...
  • २०० युनिट मोफत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील - देवराव भोंगळे
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
२०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीपूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्‍या घोषणापत्रात चंद्रपूरातील जनतेला दर महिन्‍याला विजेचे २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. पावणेदोन वर्षानंतर सुध्‍दा सरकारला समर्थन देणा-या या आमदारानी आपले आश्‍वासन पूर्ण करण्‍यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही व जनतेची फसवणूक केली आहे. अशा आमदाराला आपल्‍या पदावर राहण्‍याचा अधिकार नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे यांनी केले.
२०१९ पासून निवडून येवून चंद्रपूर शहरासाठी कुठलाही नविन प्रकल्प आणण्‍यात चंद्रपूरच्‍या आमदाराला यश आले नाही. अशातच आपल्‍या घोषणा पत्रातुन आमदारानी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला दर महिन्‍याला २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. सरकार आल्‍यापासून चंद्रपूरचे आमदार सरकारचे समर्थक म्‍हणून ओळखले जातात. अशावेळेला इतक्‍या प्रचंड बहुमतात असलेल्‍या सरकारकडून २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन पूर्ण न करता जनतेशी विश्‍वासघात करीत आहेत. अशा आमदाराना आपल्‍या पदावर क्षणभरही राहण्‍याचा अधिकार नाही व त्‍यांनी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा द्यावा, असेही श्री. भोंगळे पुढे म्‍हणाले. याप्रसंगी आमदाराच्‍या विरोधात जबरदस्‍त घोषणाबाजी झाली. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, महासचिव ब्रिजभूषण पाझारे यांनी सुध्‍दा यथोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आंदोलन करण्‍यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते गांधी चौकात जमले. त्‍यावेळी शांततापूर्ण आंदोलन करणा-या भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांना पोलिसांनी अटक केली व आंदोलन चिरडण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी न घाबरता स्‍वतःला अटक करून घेतली.
याप्रसंगी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजपा नेते प्रमोद कडू, महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महानगर महिला जिल्‍हाध्‍यक्षा अंजली घोटेकर, भाजपा महानगर महासचिव ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, राहूल घोटेकर, झोन सभापती छबू वैरागडे, शिला चव्‍हाण, आशा आबोजवार, वंदना जांभुळकर, पुष्‍पा उराडे, शीतल कुळमेथे, सविता कांबळे,  भाजपा सरचिटणीस नामदेव डाहूले, अनिल डोंगरे, राजीव गोलीवार, किरण बुटले, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्‍लीवार, रवि लोनकर, दिनकर सोमलकर, संदीप आगलावे, प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, यश बांगडे, क्रिष्‍णा चंदावार, प्रभा गुडधे, रेणु घोडेस्‍वार, साजीद कुरैशी, सुर्यकांत कुचनवार, सुनिल कोंगरे, गणेश रामगुंडावार, हिमांशु गादेवार, कुणाल गुंडावार, स्‍नेहीत लांजेवार, राम हरणे, अक्षय शेंडे, सत्‍यम गाणार, देवेंद्र बेले, बंडू गौरकार, सुरज सरदम यांची उपस्थिती होती. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top