Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उन्हाचे चटके सोसत लसीकरणासाठी रांगा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लसीकरण केंद्रावर सोई सुविधांचा अभाव धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरपना तालुक्यातील औद्योगिक परिसर नांदाफाटा येथे उन्...
  • लसीकरण केंद्रावर सोई सुविधांचा अभाव
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील औद्योगिक परिसर नांदाफाटा येथे उन्हाची पर्वा न करता चटके सोसत नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरणासाठी रांगेत उभे असून यात महिलाही मोठ्या प्रमाणात आहे.
औद्योगिक परिसर व लोकसंख्येचा बाबतीत मोठे शहर म्हणून नांदा ला ओळखल्या जाते. मागील एक महिन्या पासून कोविड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने नागरीकांना इतरत्र केंद्रांचा शोध घ्यावा लागत होता. आता लस उपलब्ध झाली असल्याने लोकांची गर्दी वाढत चालली आहे. नागरिकांची केन्द्रावर गर्दी वाढत आहे पण लसीकरणाकरिता मात्र तासन तास ताटकळत राहवे लागत आहे. तसेच पिण्याचा पाण्याची व बसण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सांस्कृतिक भवन येथे लस केंद्र सुरू आहे. भवन भव्य असून या ठिकाणी २०० नागरिक बसण्याची सुविधा आहे. पण उचित व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहवे लगत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे. आरोग्य विभागाने टोकन पध्दतीचा वापर केल्यास नागरिकांना विनाकारण उन्हाचे चटके सोसावे लागणार नाही  
लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामपंचायतीकडून मदत केली जात आहे.  महसूल, पोलिस, कृषी विभाग व शिक्षण विभागाचे कर्मचारी नांदा येथील लसीकरण केंद्रावर दिसत नाही. त्यामुळे गर्दीचा ताण आरोग्य विभागावर पडत आहे. गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी लसीकरण मोहिमेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top