Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंत्योदय राशन धारकांना शासन नियमावलीनुसार धान्य द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नकोडा काँग्रेस कमिटी मार्फत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन  आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाण...
  • नकोडा काँग्रेस कमिटी मार्फत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासन नियमावलीनुसार अंत्योदय राशन धारक कुटुंबियांना  ३५ किलो धान्य मिळण्याची तरतूद आहे. परंतु चंद्रपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या नकोडा गावातील अंत्योदय राशन धारक कुटुंबिय या योजने पासून वंचित असल्याची गंभीर बाब लक्षात येत आहे. नकोडा गावातील अंत्योदय राशन धारक कुटुंबियांना सुद्धा शासन नियमावलीनुसार प्रती कुटुंब ३५ किलो धान्य देण्यात यावे, याकरिता नकोडा काँग्रेस कमिटीचे सुनील जुमनाके व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून मागणी केलेली आहे.
संबंधित निवेदन सादर करतांना विजय वडेट्टीवार फांन्स क्लब चे प्रवीण लांडगे, काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस ट्रान्सपोर्ट युनियन चे चंद्रपूर तालुका अध्यक्ष सरू पटेल, राजेश एंगलवार, नितीन पटेल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top