- विद्यार्थ्यांसाठी कोरोना चाचणी शिबीर सारखेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे सुद्धा आयोजन करा - प्राचार्य वैभव बोनगिरवर
राजुरा -
कोरोनाची भविष्यात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगिरवार यांच्या संकल्पनेतून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या 224 प्रशिक्षणार्थीं विद्यार्थ्यांचे कोरोना अँटीजन तपासणी करण्यात आली. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिबिराचे आयोजन संस्थेच्या कान्फरंस हाॅलमध्ये करण्यात आले होते.
यात एकूण 224 प्रशिक्षणार्थी व संस्थेचे कर्मचारीवर्ग यांनी उत्सपुर्तपणे सहभाग घेतला. विशेष म्हणजे या शिबिरात सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव आले. या कार्यक्रमासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील लॅब टेक्निशियन अवी पचारे, परिचारिका साधना लेनगुरे, निलिमा कन्नाके, रोहित जामदार, अंकित तेलंग आदि कर्मचाऱ्यांचा सहयोग लाभला, शिबीराच्या यशस्वितेकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक श्रीकांत प्रतापवार, व्यंकटेश गड्डम, गरमडे सर व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रशिक्षणार्थीं विद्यार्थ्यांसाठी कोरोना चाचणी शिबीर सारखेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे सुद्धा आयोजन करण्यात आले पाहिजे असे मनोगत प्राचार्य वैभव बोनगिरवर यांनी व्यक्त केले.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.