Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वे लाईनच्या खालून बोगदा बनविण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळु धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शहरामध्ये राजुरा ...
  • नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळु धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहरामध्ये राजुरा - आसीफाबाद - हैदराबाद हा राज्य महामार्ग आहे. यामार्गावरती माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचा गेट आहे. या रेल्वे ट्रॅक वरून मानिकगड सिमेट, अंबुजा सिंमेट, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिंमेट तसेच सास्ती रेल्वे साईडींग, पांढरपौनी रेल्वे साइडिंग येथील सिंमेट कोळसा वाहतूक होत असते. या वाहतूकीमूळे दिवसभरात १० ते १५ वेळा प्रत्येकी १५ ते २० मिनिटा करीता रेल्वे गेट बंद असते. आणी त्या रेल्वे गेट च्या पलीकडे शिवाजी महाविदयालय, शासकीय आयटीआय, कॉलेज, टेक्नीकल कॉलेज, बस आगार राजुरा शहरातील प्रमुख बाग, आदर्श विदयालय, एमएसईबी कार्यालय, पॉवर हाऊस, आदिवासी मूला मुलींचे वस्तीगृह, व्यापारी भवन, सुतार समाजाचे समाज भवन आहे. त्या गेट पलीकडे येवढी मोठी रहदारी असल्यामुळे नागरिकानां, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. या रोडाच्या उजव्या बाजूस अगोदरपासून  बोगदा आहे. म्हणून सदर बोगदयाचे काम त्वरीत पूर्ण करावे अश्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळु धानोरकर यांच्या दिले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top