Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चालत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पेपर मिलच्या नाल्यात सापडला मृतदेह रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - स्थानिक किल्ला वॉर्ड आवारातून जात असलेल्या विसापूर रोडजवळ ...
  • पेपर मिलच्या नाल्यात सापडला मृतदेह
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
स्थानिक किल्ला वॉर्ड आवारातून जात असलेल्या विसापूर रोडजवळ रेल्वे ट्रॅकखाली तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये प्रवास करणारा तरुण चालत्या ट्रेनमधून पडल्यानंतर त्याचा मृतदेह पेपर मिलच्या मागे असलेल्या नाल्यात आढळला. मृतक तेलंगणा राज्यातील कांचीगुडा येथून उत्तर प्रदेशातील संबलकडे जात असताना हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. त्याच्याकडून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आणि आधार कार्ड पोलिसांना मिळाले आहे. 
बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेहाची ओळख साठी दवाखान्यात ठेवला आहे. तरुणाचे नाव मोहमद नन्हे अब्दुल हकीम (२६) रा. रचैता, असमौली, संभल, उत्तर प्रदेश राज्याचा रहिवासी असल्याची माहिती त्याच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवरून मिळाली आहे, पोलिसांनी याबाबतची नोंद दाखल केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर करत आहेत. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top